Ad will apear here
Next
राज्यातील दहा महापालिका व 11 जिल्हा परिषदांसाठी शांततेत मतदान



महापालिकेसाठी 56.30, तर जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान


- 17 हजार 331 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

- मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढली,

- शिवसेना-भाजपात जोरदार चुरस

- मुंबईत 11 लाख मतदारांची नावे गायब


मुंबई - मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूरसह दहा महानगरपालिका, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारासह 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाछया 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या 17 हजार 331 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले असून गुरुवारी, 23 फेब्रुवारी रोजी कोणाच्या नशिबाला चार चॉंद लागणार याचा फैसला होणार आहे. 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30 तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई शहरात 55 टक्के मतदान झाले असून वाढलेल्या टक्क्‌यांचा कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार याबाबत राजकिय वर्तुळात अंदाज व्यक्त केले जात आहेत.

देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मताधिकार बजावला. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मातोश्री सरिता फडणवीस यांनी मताधिकाराचा हक्क बजावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांच्यासह क्रिकेटविर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, गुलजार,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान केले. परंतु मतदार याद्यांचे पुर्ननिरीक्षण करताना तब्बल 11 लाख नावे वगळण्यात आल्याने हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे शिवसेना व कॉंग्रेसने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. मुंबई, नाशिकसह आणखी काही भागात असाच प्रकार घडल्याने गोंधळ उडाला होता. नाशिक येथे मतदानाचा अधिकार न मिळाल्याने नागरीकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.

शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेसह सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या दुसछया टप्प्यात आज काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले. महापालिका निवडणुकीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अत्यंत कमी मतदान होते असा इतिहास असल्याने यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली होती. अनेक स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमांनी लोकांनी मतदानाचा हक्क बजाववा यासाठी प्रचार मोहीम राबवली होती. परिणामी यावेळी मतदानात यावेळी थोडा उत्साह जाणवत होता. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अकरा वाजेपर्यंत मुंबई व ठाण्यात जवळपास वीस टक्के मतदान झाले होते. दुपारी दीडवाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 30 ते 35 टक्क्‌यांपर्यंत गेली होती.

मध्यंतरी राज्यात मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी झालेल्या पडताळणीत एकट्या मुंबई शहरातील लाखो नावे वगळण्यात आली. त्यातील काही नावे दुबार म्हणजे दोन ठिकाणी होती, तर काही ठिकाणी ते लोक त्या पत्त्यावर राहत नसल्याचे दिसून आल्याने त्यांची नावे कमी करताना वर्षनुवर्ष मतदान करणाछया व त्याच ठिकाणी वास्तव्य असलेल्या हजारो लोकांचीही नावे वगळली गेल्याने अनेकांना मातदानापासून वंचित राहावे लागले. याशिवाय यावेळी वॉर्डांची पुनर्रचना झाल्याने मोठे फेरबदल झाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान केलेले लोक यादीत नावे आहेत कि नाही, ही खातरजमा न करता मतदान केंद्रावर जात होते. परंतु, प्रभाग बदल्यामुळे काही जणांना आपले मतदान वेैंद्र कुठे आहेत याची माहिती नसल्याने मतदारांच्या गोंधळात भर पडल्याचे दिसत होते.

* मराठी बहुल भागात जबरदस्त रस्सीखेच !

जगावटपावरून युती तुटल्याने मुंबईसह सर्वत्र स्वबळावर लढणाछया शिवसेना-भाजपात या निवडणुकीत जोरदार संघर्ष झाला. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा आत्मा असून शिवसेनेचे बलस्थान असलेला हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपने आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे. मुंबईतील मराठी बहुल भाग ही शिवसेनेची ताकद असून त्यालाच भाजपने सुरुंग लावून सेनेचे अनेक शिलेदार फोडले आहेत. त्यामुळे एरवी एकतर्फी निवडणूक होणाछया या प्रभागात आज दोन्ही बाजूने जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यामुळे या भागात काहीसा तणाव होता,परंतू तेथे चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तसाच संघर्ष मुस्लिमबहुल भागात समाजवादी पार्टी व एमआयएम च्या कार्यकत्र्यांमध्ये पाहायला मिळाला.

* मुंबईत मतदानाचा विक्रम !

प्राथमिक माहितीनुसार मुंबईत 55 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. 1992 साली मुंबईत 49.14 टक्के मतदान झाले होते. तो विक्रम आजवर कायम होता. 97 साली 44.36 टक्के,2002 साली 42.05 टक्के, 2007 साली 46.05 टक्के व 2012 साली 44.75 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी एकदम 8 ते 10 टक्क्‌याने वाढली असून वाढलेल्या या टक्केवारीचा कोणाला फायदा मिळणार याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. मतदानाची वाढलेली टक्केवारी परिवर्तन घडण्याचे संकेत असून भाजप ला याचा फायदा मिळेल असा दावा भाजप नेते करत आहेत. तर विधानसभेतही विक्रमी मतदान झाले होते व भाजप व शिवसेनेला जवळपास सारख्याच जागा मिळाल्या होत्या, तसेच तेव्हाची मोदी लाट आता नसल्याने वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शिवसेनेला होईल असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही वाढलेले मतदान गरीब वस्त्यातले असून कॉंग्रेसला मागच्या पेक्षा अधिक यश मिळेल असा दावा केला आहे. यातील कोणाचा दावा खरा ठरणार याचा फैसला गुरुवारी होणार आहे .

* शिवसेनेची भाजपविरुद्ध तक्रार !

निवडणूक आयोगाने जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर जाहिरात देण्यावर निर्बंध घातलेले असताना आज मुंबईतील काही दैनिकांमध्ये 'इंडीया फस्रट' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून परिवर्तन व परदर्शकतेला मतदान करण्याचे आवाहन करणाछया पानभर जाहिराती देण्यात आल्या होत्या. चित्रपट अभिनेता अमीर खान यांच्या छायाचित्रांनीशी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत भाजपचे थेट नाव नसले तरी त्यांचा अजेंडा पुढे रेटण्यात आल्याचा आरोप करून यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच प्रचाराची मुदत संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी वृत्त वाहिन्यांना व वृत्तपत्रांना मुलाखती देऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप ही या तक्रारीत करण्यात आला आहे.

* प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी:

बृहन्मुंबई- 55, ठाणे- 58, उल्हासनगर- 45, पुणे- 54, पिंपरी-चिंचवड- 67, सोलापूर- 60, नाशिक- 60, अकोला- 56, अमरावती- 55 आणि नागपूर- 53. एकूण सरासरी- 56.30.


प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी अशी:

रायगड- 71, रत्नागिरी- 64, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 68, पुणे- 70, सातारा- 70, सांगली- 65, सोलापूर- 68, कोल्हापूर- 70, अमरावती- 67 आणि गडचिरोली- 68. सरासरी- 69.43.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FWPKAZ
Similar Posts
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? मुंबई : राज्यात नुकताच झालेल्या महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची 25 वर्षाची तुटली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षाना बहुतम मिळवता आले नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर आपला व्हावा म्हणून दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाला आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवले
ठाण्यात शिवसेना 20, राष्ट्रवादी 18 जागांवर आघाडीवर राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 267 उमेदवारांमध्ये लढत होत आहे
पुणेकरांचा कौल विकासाला ! पालकमंत्री बापट : कारभारी बदलले, पुणेही बदलेल पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसला हद्दपार करून विकास करण्यासाठी पुणेकरांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. तो आम्ही सार्थकी लावू. भाजपचा हा महाविजय कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी दाखविलेल्या निष्ठेचा आहे. पुणेकरांनी विकासाला कौल दिला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
मुंबई व ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजपच अव्वल! मुंबई: राज्यातील 10 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेने आपले स्थान कायम ठेवले आहे. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आदी महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language